चाळीसगावातील सुरेश स्वार यांची जळगाव जिल्हा मिनी गोल्फ संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड
चाळीसगाव : चाळीसगाव पालिकेतील शहर विकास आघाडीचे उपनेते व चाळीसगाव महाविद्यालयाचे चेअरमन सुरेश स्वार यांची जळगाव जिल्हा मिनी गोल्फ संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.
निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
स्वार हे काही क्रीडा संघटनांमध्ये पदाधिकारी असून त्यांच्या निवडीबद्दल आमदार मंगेश चव्हाण, खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल, उपाध्यक्ष योगेश अग्रवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, डॉ.प्रदीप तळवेलकर, चंद्रकांत सोनवणे, कुणाल सुर्वे, पंकज साळुंखे यांनी स्वारा यांचे अभिनंदन करीत सत्कारही केला. गोल्फ खेळाविषयी खेळाडूंमध्ये जनजागृती करण्यासह ग्रामीण भागात या खेळाचा प्रसार करणार असल्याचे यावेळी सुरेश स्वार यांनी सांगितले.








