’फैजपूरात नारीशक्ती वंदना-खेळ पैठणीसाठी सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगांवकर येणार !


फैजपूर : भाजपाचे सदस्य तथा रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील व दर्जी फाऊंडेशन जळगावचे संचालक गोपाळ दर्जी यांनी फैजपूर शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भेट घेऊन संवाद साधला.

श्रीराम पाटील यांचा सन्मान
23 फेब्रुवारी रोजी खंडोबा देवरथान, फैजपूर येथे होणार्‍या भाजपा घोषीत ‘नारीशक्ती वंदना’ निमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रमास सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगांवकर व टी.व्ही.स्टार बाल गायीका सहयाद्री मळेगांवकर येणार असून त्यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. प्रसंगी श्रीराम पाटील व गोपाळ दर्जी यांचा फैजपूर भाजपातर्फे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित शहराध्यक्ष अनिल तेली, समाजसेवक रवींद्र होले यांचा ही पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय सराफ यांनी केले. माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, पांडुरंग सराफ, राकेश जैन, नितीन राणे, भारती पाटील, जयश्री चौधरी, नरेंद्र चौधरी, श्याम भंगाळे, विनोद बोरोले, विनोद कोल्हे, संजीव भावसार, हसन तडवी, नागो मंडवाले, भारत चौधरींसह कार्यकर्ते उपस्थित होते.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !