यावल शहरात शिवजयंती मिरवणुकीत सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष


In Yaval city, Shiv Jayanti procession attracted attention with lively scenes यावल : यावल शहरातील बोरावल गेटजवळ सोमवारी सायंकाळी शिवतीर्थ येथे पूजन केल्यानंतर मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते शिवस्मारकाचे पूजन करण्यात आले व नंतर सजीव देखाव्यासह एका वाहनावर भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती विराजमान करीत सवाद्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. रात्री साडेदहा वाजता या मिरवणुकीचा समारोप झाला. शिवरत्न फाउंडेशन छत्रपती ग्रुप उत्सव समितीच्या माध्यमातून ही मिरवणूक काढण्यात आली होती.

यांची होती उपस्थिती
यावल शहरात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील बोरावल गेटजवळ असलेल्या शिवस्मारकाजवळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोमवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. शिवस्मारक येथे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, डॉ.कुंदन फेगडे, एनएसयुआयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी, भगतसिंग पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, नितीन सोनार, अ‍ॅड.देवकांत पाटील, भूषण फेगडे, अ‍ॅड.गोविंद बारी, एस.के.बाविस्कर, राजेश करांडे, डॉ.रवीकांत सोनवणे, उत्सव समितीचे अध्यक्ष नरेंद्र शिंदे आदींच्या उपस्थितीत पूजन केल्यानंतर सजीव देखाव्यासह शिवछत्रपती व त्यांचे मावळे त्याचप्रमाणे एका भव्य वाहनावर छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती सजवून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सहा.पोलीस निरीक्षक हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, सहायक फौजदार असलम खान, सुशील घुगे सह कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला. मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष नरेंद्र शिंदे, सचिव किशोर माळी, उपाध्यक्ष शाहरुख तडवी, खजिनदार सागर कोळी, ऋषिकेश कोळी, सागर लोहार,विजय भोई सह सर्व शिवरत्न फाउंडेशन छत्रपती ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



सकाळी निघाली रॅली
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकाळी शहरातून मोटासायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला बोरावल गेट शिवतीर्थापासून सुरूवात झाली. माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवली. रॅलीत यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, नरेंद्र शिंदे, किशोर माळी, विजय भोई, कमलेश शिर्के, गोलू पाटील यांच्यासह तरुण मंडळींनी सहभाग घेतला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !