बोदवड शहरात शिवजयंती मिरणुकीवर जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी ठरली लक्षवेधी
Flower shower by JCB on Shiv Jayanti Mirnuki in Bodwad town was eye catching बोदवड : रयतेचा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. बोदवड शहरातील जिजाऊ बालोद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.
मिरवणुकीने वेधले लक्ष
जिजाऊ बालोद्यानापासून सकाळी दहा वाजता मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखावे, मावळे, घोडे, डी.जे. भवानी डान्स नृत्य सादर करत मिरवणूक काढण्यात आली. बोदवड तालुक्यातील जेसीबी मालकांनी त्यांचे 15 जेसीबी आणत मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार व पूजन करण्यात आले. गांधी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारीत बरडीया इंटरनॅशनल स्कूलच्या लहान विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. शिवद्वार येथे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातून प्रभात फेरीमार्गे मिरवणूक काढण्यात आली. जिजाऊ बालोद्यान येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.


यावेळी बोदवड शहरासह तालुक्यातील शिवप्रेमींनी उपस्थिती दिली. बोदवड शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष अक्षय चौधरी, उपाध्यक्ष अजय पाटील, सचिव शुभम माळी, पदाधिकारी व शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी परीश्रम घेतले.






