कापूस विक्रीचे सात लाख लूटले : एरंडोल तालुक्यातील सासरा-जावयाला बेड्या

धुळे गुन्हे शाखेकडून गुन्ह्याची उकल : रोकडसह मोबाईल केला जप्त


7 lakhs looted from cotton sales : Father-in-law-son-in-law chained in Erandol taluka धुळे : कासोदा, ता.एरंडोल येथील शेतकर्‍याचा कापूस विक्रीतून आलेली सुमारे सहा लाख 80 हजारांची रोकड दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मारहाण करीत लूटल्याची तक्रार आयशर चालकाने नरडाणा पोलिसांकडे केली होती. मंगळवारी दुपारी भर दिवसा झालेल्या लुटीनंतर पोलीस प्रशासनही चक्रावले होते मात्र धुळे गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात अत्यंत चातुर्याने या गुन्ह्याचा तपास करीत दरोड्याचा बनाव हा आयशर चालकानेच घडवून आणल्याचे उघडकीस आणले. लुटीचा बनाव करणार्‍या आयशर चालकासह त्याच्या सासर्‍याला अटक करण्यात आली. रवींद्र लक्ष्मण सोनवणे (आडगाव, ता.एरंडोल) व मोहन निंबा महाजन (एरंडोल, जि.जळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

लुटीचा बनाव मात्र तपासात बिंग फुटले
विजेंद्र हिंमत भोई (कासोदा, ता.एरंडोल) यांच्या मालकिचा कापूस आयशर चालक रवींद्र लक्ष्मण सोनवणे (आडगाव, ता.एरंडोल) हा सेंधवा येथे विक्रीसाठी घेवून गेला होता. कापूस विक्रीनंतर रोकड घेवून चालक परतीच्या प्रवासात असताना मंगळवार, 20 रोजी दुपारी 3.50 वाजेच्या सुमारास होळ गावानजीक दुचाकीवरून आलेल्या दोन लुटारूंनी आयशर (एम.एच.19 झेड.5203) ला अडवत तिच्या दर्शनी भागाच्या काचा फोडल्या तसेच चालकाला बेदम मारहाण करीत त्याच्याकडील सहा लाख 82 हजार 915 रुपयांची रोकड हिसकावून पळ काढल्याची माहिती आयशर चालक सोनवणे याने नरडाणा पोलिसांना दिली. भर दिवसा झालेल्या लुटीच्या प्रकारानंतर पोलीस प्रशासनाने कसून तपासाला सुरूवात केली तर आयशर चालकाला विश्वासात घेवून बोलते केल्यानंतर त्याच्या बोलण्यात विसंगीत आढळल्यानंतर त्यास बोलते करताच त्याने लूट झाली नसल्याचे सांगत स्वतःच वाहनाच्या काचा फोडल्याचे सांगून लुटीतील रोकड सासरे निंबा महाजन (एरंडोल) यांच्याकडे दिल्याची कबुली दिली. दोघा आरोपींना धुळे गुन्हे शाखेने बेड्या ठोकत मोबाईलसह रोकड जप्त केली.






यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कैलास दामोदर, संजय पाटील, संतोष हिरे, योगेश चव्हाण, प्रशांत चौधरी, हेमंत बोरसे, चेतन बोरसे, संदीप सरग, संदीप पाटील, तुषार सूर्यवंशी, प्रल्हाद वाघ, देवेंद्र ठाकूर, जगदीश सूर्यवंशी, चालक कैलास महाजन यांनी उघडकीस आणला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !