भुसावळात ‘सतर्कते’त रेल्वे प्रशासन पास मात्र व्हायरल मेसेजमुळे मॉकड्रिलचे गांभीर्यच संपले !

24 तासांपूर्वीच मॉक ड्रिलचा मेसेज व्हायरल : प्रशासन म्हणाले, आदेशाचे केले पालन


In Bhusawal, the railway administration passed on ‘vigilance’, but due to the viral message, the seriousness of the mock drill ended!भुसावळ : रेल्वे वाहतुकीदरम्यान अप्रिय घटना, अपघात घडल्यानंतर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी किती वेळेत पोहोचतात या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडून मॉक ड्रिल चाचणी घेण्यात येते मात्र 24 तासांपूर्वीच मॉक ड्रिलचा मेसेज व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी रेल्वेतर्फे झालेल्या मॉकड्रिलचे गांभीर्य राहिले. रेल्वे प्रशासनाने मात्र सतर्कतेसाठी ही चाचणी नसल्याचे सांगत होम मिनिस्ट्रीतर्फे आलेल्या आदेशान्वये मॉक ड्रिल चाचणी केल्याचे सांगितले.

सतर्कतेत रेल्वे प्रशासन पास
मध्य रेल्वेच्या भुसावळ प्रशासनातर्फे गुरुवारी दुपारी लोकोशेडमध्ये मॉक ड्रिल होणार असल्याचा संदेश 24 तासांपूर्वीच लिक झाल्याने सोशल मिडीयात तो फिरला त्यामुळे सर्वच अधिकारी व कर्मचार्‍यांना न घडलेला अपघात हा मॉकड्रिलचा भाग असल्याचे ठावूक असल्याने त्यांच्यात मॉकड्रिलबाबत फारसा उत्साह जाणवला नाही शिवाय दोन दिवसांपूर्वी लोको शेडमध्ये भुसावळ ईगतपुरी-भुसावळ (डबा नंबर 03603 व 03604) हे एकमेकांद्वारे क्रेनद्वारे चढवण्यात आले होते. दरम्यान, 12.02 वाजता हूटर (भोंगे) वाजून रेल्वे लोकोशेडमध्ये अपघात झाल्याची सूचना देण्यात आल्यानंतर एनडीआरएफ, आरपीएफ, जीआरपी, रेल्वे प्रशासनाची यंत्रणा अलर्ट झाली तर मेडिकल टीमसह अ‍ॅक्सीडंड रीलीफ ट्रेनही रवाना करण्यात आली.



रेल्वे बोर्डाच्या आदेशाचे पालन : डीआरएम
डीआरएम ईती पांडे म्हणाल्या की, गुरुवारी झालेले मॉकड्रील हे सरप्राईज नव्हते. होम मिनिस्ट्रीकडून आलेल्या आदेशानुसार व ठरलेल्या तारखेनुसार अंमलबजावणी केली. अपघात घडल्यानंतर किती वेळात आमची यंत्रणा दाखल होते याबाबतचा आढावा त्यातून घेण्यात आला. सर्व यंत्रणांना फोन गेले तसेच संबंधितांमध्ये को ऑर्डीनेशनही त्यातून दिसून आल्याचे डीआरएम पांडे म्हणाल्या.

तातडीने रेस्क्यू ऑपरेशन
रेल्वे लोकोशेडमध्ये अपघाताची माहित कळताच शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांच्या सुमारे 10 रुग्णवाहिका दाखल झाल्या तर डब्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून त्यांना स्टेचर व रुग्णवाहिकेतून त्यांना हलवण्यात आले. गंभीर, जखमी अश्या रुग्णांचे स्वतंत्र उपचाराची व्यवस्था करण्यात आली. रेस्क्यू ऑपरेशन रोपच्या साह्याने करण्यात आले. पुणे येथील एनडीआरएफ पथकाचे अधिकारी, कर्मचारी, श्वान पथक, आरपीएफ, पोलिस, डीआरएम इति पांडे व अन्य अधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. पुणे येथील श्वान पथक घटनास्थळी होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !