मोफतच्या गहू व तांदूळ यांना भुलू नका : राज राजापूरकर
निंभोरा येथे राष्ट्रवादी ओबीसी सेलचा मेळावा
Don’t forget free wheat and rice : Raj Rajapurkar निंभोरा : आगामी काळात पुन्हा भाजपा सरकार निवडून आल्यास यापुढे लोकशाही संपुष्टात येईल, असा दावा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी येथे केला. मोफतच्या गहू, तांदूळ यांना भुलू नका, असे आवाहनही त्यांनी येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा ओबीसी सेल मेळावा येथे झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुण पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद भोंडे, प्रदेश संघटक आसीफ खान, जिल्हाध्यक्ष शालिग्राम मालकर, राष्ट्रवादी रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख अतुल पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, बाजार समिती संचालक मंदार पाटील, पंचायत समितीचे माजमी सदस्य दीपक पाटील यांची उपस्थिती होती.


शेतकर्यांना फसवणार्यांना मतदान करू नका : अतुल पाटील
बहुजन जुडाओ देश बढाओ या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्रात राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या बाईक रॅलीच्या माध्यमातून राज्यभर दौरा सुरू आहे. मुक्ताईनगर येथून रावेर तालुक्यात रॅली दाखल झाल्यावर कॉर्नर सभेचे आयोजन निंभोरा येथे करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध धोरणांवर टीका करीत बहुजन समाज ओबीसी घटकांसाठी काम करण्यासाठी नेहमीच शरदचंद्र पवार व राष्ट्रवादी पक्ष अग्रेसर राहिला असल्याचे सांगत आगामी काळात मोफत गहू व तांदूळ या संकल्पनांना भुलून शेतकर्यांना फसवणार्यांना मतदान न करण्याचे आवाहन केले. माजी आमदार अरुण पाटील यांनी शासनाच्या फसव्या योजना, पीक विम्यात झालेली शेतकर्याची फसगत, सर्वसामान्यांना महागाईतून होणारी अडचण याबाबत प्रकाश टाकला.
यांची कॉर्नर सभेला उपस्थिती
कार्यक्रमास प्रमुख म्हणून माजी सरपंच डिगंबर चौधरी, सरपंच अमोल महाजन, अनिल आसेकर, वडगावचे सरपंच धनराज पाटील, निंभोरा विकास सोसायटी चेअरमन सुधीर मोरे, संचालक नितीन भंगाळे, कैलास भंगाळे, ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील, दिलशाद खान, गणेश देवगिरीकर, बापू चर्हाटे, विवेक बोंडे, ललित कोळंबे, प्रल्हाद महाजन, निलेश पाटील, विनोद राठोड, संजय महाजन, रावेर राष्ट्रवादी ओबीसी शहरप्रमुख राजू खाटीक, शेख असलम, इकबाल शेख यांच्यासह कार्यकर्ते या कार्यक्रमास हजर होते. सूत्रसंचालन सुनील कोंडे तर आभार ललित कोळंबे यांनी मानले.






