भुसावळात मच्छरांचा सुळसुळाट : फवारणीबाबत भुसावळ पालिका प्रशासनाला शिवसेनेचे साकडे
भुसावळ : भुसावळ शहरातील सर्वच भागात मच्छरांचा उपद्रवी वाढला असून परीणामी नागरीकांचे आरोग्या धोक्यात येण्याची भीती आहे. नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग पालिका असताना महिन्याकाठी सात लाख रुपये फवारणीवर खर्च केले जात असताना प्रत्यक्षात मात्र फवारणी होत नसल्याने या संदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील पदाधिकार्यांनी उपमुख्याधिकारी लोकेश ढाके यांच्याकडे केली. यावेळी अधिकार्यांना मच्छर अगरबत्ती भेट देण्यात आली व पालिकेने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
फवारणीचे दिवस ठरवावेत
दोन लाख वस्तीच्या या शहरात मच्छरांचा सुळसुळाट झाला आहे. नगरपालिका सुस्त असून नागरीकांना अस्वच्छता व मच्छरांमुळे घरात वा अंगणात बसणेही कठीण झाले आहे. नगरपालिकेने शहरात चार दिवसांत औषध फवारणी व रीक्षाद्वारे धुरळणी करावी, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख दीपक धांडे यांनी केली आहे.


अधिकार्यांना मच्छर अगरबत्ती भेट
शिवसेना ठाकरे पक्षातर्फे नगरपालिका अधिकार्यांना मच्छर अगरबत्ती भेट देण्यात आली. उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, अग्निशमन विभागाचे अभियतां माकोडे उपस्थित होते. अधिकारी म्हणाले की, दरमहा सा लाख रुपयांचा ठेका 12 महिन्यांसाठी दिला असून शहरात औषध फवारणी व धुरळणी सुरू आहे. वर्षाला 84 लाख रुपये फवारणीवर केले जात असताना शहरात फवारणीच होत नसल्याचा दावा यावेळी पदाधिकार्यांनी केला तर यापुढे कुठल्याही वॉर्डात कोणत्या दिवशी फवारणी होईल याबाबतचा तक्ता पालिकेने जाहीर करून त्याबाबत सोशल मिडीयातून जनजागृती करावी, अशी मागणी पदाधिकार्यांनी केली. यापुढे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक प्रत्येक भागात फवारणी होते किंवा नाही यावर लक्ष ठेवतील, असेही पदाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना शहर प्रमुख दीपक धांडे, निलेश महाजन, मुकेश गुंजाळ, दिलीप सुरवाडे, बबलू बर्हाटे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुरज पाटील, शरद जैस्वाल, राकेश खरारे, शेख महमूद, योगेश बागुल, विकास खडके, सोनी ठाकूर, पिंटू भोई, संजू भोई, अरुण साळुंके, मनोज पवार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.






