मनोज जरांगे पाटील आक्रमक : उपमुख्यमंत्री फडणवीसांवर केला हा गंभीर आरोप


Aggressive Manoj Jarange Patil : This is a serious allegation against Deputy Chief Minister Fadnavis मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अंतारवाली सराटीतून जरांगे यांनी पत्रकार परीषद घेत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. काही लोकांना पुढे करुन मला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मला संपवण्याचं कटकारस्थान होत असल्याचे जरांगे यांनी सांगत मीच आता मुंबईतील सागर बंगल्यावर येतो, असे म्हणत जरांगे आपल्या जागेवरुन उठले अन् अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आलं.

फडणवीसांवर केला गंभीर आरोप
मला संपवण्याचं कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनी रचलं आहे. त्यांच्याच माध्यमातून वेगवेगळी लोकं पुढे करून माझ्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. फडणवीसांना माझा बळीच हवा असेल तर मी आज त्यांच्या सागर बंगल्यावर येतो, त्यांनी मला ठार करावं. मी सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार आहे, अशी घोषणाही जरांगे यांनी केली. यावेळी, राजकीय नेत्यांची उदाहरणे देत फडणवीस हे दमदाटी आणि धाक दाखवून पक्ष आणि नेते फोडत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे. तसेच माझ्यावर करण्यात आलेले आरोप सर्व खोटे असून त्यांनी तक्रार दाखवा मी तुमचं ऐकेन, असेही म्हटले.



फडणवीसांनी नेत्यांना संपवलं
देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे जाती-जातीत भांडणं लावणं आणि जाती-जातीच्या नेत्यांना संपवणे असंच आहे. बहुजन, मराठा आणि ओबीसी संपला पाहिजे, हा त्यांचा डाव आहे, असे म्हणत जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला. माझा बळी घ्या पण सगे-सोयरेची अंमलबजावणी करूनच आपण घेणार, सागर बंगल्यावर आंदोलन करायला येणार असल्याचं जरांगे यांनी ठणकावून सांगितले आहे.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !