नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांची सातपूडा जंगलात सफारी
Nashik Division Commissioner Radhakrishna Game Safari in Satpooda Forest रावेर : नाशिक विभागाचे विभागीय राधाकृष्ण गमे यांनी प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण पाल व जवळच असलेल्या गारबर्डी वनक्षेत्रात पाहणी केली. या क्षेत्रात पर्यटन प्रेमीसाठी जंगल सफारी सुरू होत असून त्याची प्रत्यक्ष जंगल सफारी गमे यांनी करून पाल येथील अनुपम विश्रामगृहाची पाहणी करीत आढावा घेतला.
या परीसराचा जंगल सफारीत समावेश
नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पाल परिसरात सातपूडा जंगल सफारी केली. यावेळी सहायक विभागीय आयुक्त विठ्ठल सोनवणे, रावेर प्रादेशिक वनविभागाचे वनक्षेत्रपाल अजय बावणेंसह वनपाल, वनरक्षक उपस्थित होते. जंगल सफारीत अस्वल, ससा, मोर, रानडूक्कर, बिबट्याच्या पायाचे ठसे आयुक्तानां दिसले. सातपुडा जंगल सफारी गारबर्डी रोपवाटीकेपासून सुरू होते. यात सुकी धरण, मचान, त्रिवेणी धबदबा, अवणी संरक्षणकूटी, माकडदरी धबदबा या परीसराचा समावेश प्रादेशिक वनविभागाने केला आहे.



24 किलोमीटर अंतरात विविध प्राण्यांची नोंद
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जंगल सफारी करताना वनक्षेत्रपाल बावणे यांच्याकडून प्राण्यांविषयी माहिती घेतली. 24 किलोमीटर अंतरात आतापर्यंत बिबट, अस्वल, मोर, रानडूक्कर, निलगाय, सांबर, चिंकारा, हरीण, सर्पगरूड, अजगर, तडस, कोल्हा, लाडंगा या प्राण्याचीं नोंद वनविभागाने केली आहे.
एप्रिल महिन्यात सुरू होईल जंगल सफारी
सातपूडा पाल जंगल सफारी सामान्य नागरीकांसाठी सुरू करण्यासाठी प्रादेशिक वनविभागाने स्थानिक वनमजुरांना प्रशिक्षण दिले आहे. 31 मार्चनंतर साधारणतः एप्रिल महिन्यात सातपूडा पाल जंगल सफारी ही सामान्य जनतेसाठी खुली करण्यात येईल, अशी माहिती वनक्षेत्रपाल अजय बावणे यांनी दिली.
ब्रिटिशकालीन अनुपम विश्रामगृहाची देखरेख चांगली
ब्रिटिश काळातील पाल वनविभागाच्या आवारात अनुपम बगंला आहे. वनविभाग अधिकार्यांनी व कर्मचारी यांनी या अनुपम विश्राम गृहाची देखरेख व्यवस्थित राखल्याने नाशिक विभागीय आयुक्त गमे यांनी कौतुक केले.





