बीपीएमएस वेबसाईड बंदमुळे बांधकाम परवानग्या रखडल्या

भुसावळात 25 तर विभागात 80 पेक्षा अधिक प्रकरणांना ब्रेक


Construction permits stalled due to BPMS website shutdown भुसावळ : महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बांधकाम परवानग्यांसाठी महाआयटीने तयार केलेली बीपीएमएस ही ऑनलाइन सिस्टीम गेल्या दीड ते पावणेदोन महिन्यांपासून बंद असल्याने शहरात पालिकेच्या माध्यमातून बांधकाम परवानग्या देण्याची प्रक्रिया रखडली आहे. शहरासह विभागात तब्बल 80 पेक्षा अधिक बांधकाम परवानग्या रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात भुसावळ शहरातील सुमारे 25 प्रकरणांचा समावेश आहे.

परवानगी मिळत नसल्याची ओरड
नगरपालिकांमधून मिळणारी बांधकाम परवानगी ऑफलाईन पद्धतीने दिली जात होती मात्र नागरिकांना बांधकाम परवनागी सहज आणि वेळेत उपलब्ध व्हावे या हेतूने ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. त्यासाठी बीपीएमएस वेबसाइट (https://www.mahavastu.maharashtra.gov.in) नगरविकास विभागाने गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरू केली होती मात्र या वेबसाईटमध्ये काही त्रृटी येऊ लागल्याचे समोर आले. या वेबसाईडवरुन परवानगी लवकर मिळणे तर दूरच पण ऑफलाईन प्रक्रियेपेक्षाही अधिक विलंब होत आहे. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून तर बीपीएमएस साईटच बंद पडल्याचे समोर आले आहे त्यामुळे आर्किटेक्टकडून बांधकाम परवानग्या अपलोड होणे बंद झाले आहे. भुसावळ विभागात यावल, फैजपूर, सावदा, रावेर, वरणगाव आदी नगरपालिकांमध्येही हीच स्थिती निर्माण झाल्याने बांधकाम परवानगी मिळत नसल्याची ओरड वाढली आहे.




नवीन बांधकामांवर ब्रेक
बीपीएमएस साईटवरच बांधकाम परवानगीची संचिका अपलोड करण्याचे आदेश असल्याने ऑफलाईन पद्धतीने परवानगी देणे बंद असल्याने बांधकाम परवानगी देणारी यंत्रणाच कोलमडली आहे. बांधकाम परवानग्या रखडल्याने नवीन बांधकामे सुरू होण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत.

ऑफलाईन सेवा द्यावी
परवानगीसाठी रीतसर शुल्क भरूनही तांत्रिक अडचणींमुळे परवानगी मिळत नसल्याची स्थिती आहे. यामुळे बीपीएमएस साईड सुरू होत नाही, तोपर्यंत पूर्वीप्रमाणे ऑफलाईन सेवा दिली जावी. परवानगीसाठी मानसिक, शारीरीक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार असल्याचे असल्याचे भाजप प्रदेश कार्यकारीणी निमंत्रीत सदस्य डॉ.नि.तू. पाटील म्हणाले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !