भुसावळातील नितीन धांडे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी : उद्या भाजपात प्रवेश


Nitin Dhande of Bhusawal quits NCP : joins BJP tomorrow भुसावळ : भुसावळ राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व अष्टभूजा डेअरीचे संचालक नितीन धांडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असून मंगळवारी मुंबईत त्यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश होत आहे. नितीन धांडे यांच्या भाजपा प्रवेशाने आगामी काळातील नगरपालिका निवडणुकांमध्ये प्रभागातील स्थानिक राजकारणातही मोठे बदल घडणार असल्याची दाट शक्यता आहे.

धांडे यांचा उद्या मुंबईत पक्षप्रवेश
भुसावळातील अनेक माजी नगरसेवकांसोबत नितीन धांडे हे सोमवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत. मंगळवारी सकाळी पक्ष कार्यालयात वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.




सामाजिक कार्यात अग्रेसर
अष्टभूजा डेअरीचे संचालक असलेले नितीन धांडे यांचा सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून नितीन धांडे हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चाही सुरू होत्या व या चर्चा आता खर्‍या ठरत आहे. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात नितीन धांडे हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !