मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे : आता साखळी उपोषण !
Manoj Jarange Patil’s fast to death behind: now a chain fast! आंतरवाली सराटी : डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेण्याची घोषणा केली मात्र आंतरवाली सराटीतील साखळी उपोषण यापुढेही सुरू राहण्याचा निर्धार त्यांनी केला शिवाय दोन दिवसात दिशा ठरवू, असेही त्यांनी सांगितले.
मराठा आंदोलक गावात दाखल
सोमवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे आंतरवालीत दाखल झाले आहेत. तिथे उपस्थित मराठा बांधवांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले असून आपण संध्याकाळी पाच वाजता निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले तसेच शांततेत धरणे आंदोलन सुरू ठेवा, अशी विनंती त्यांनी केली आहे. दरम्यान, परिस्थिती बघून शहाणी भूमिका घ्यावी लागेल, एकाही मराठ्याला त्रास झाला नाही पाहिजे. आता सर्व समाज बांधवांनी घराकडे जावे आणि संचारबंदी उठल्यावर आंतरवालीत यावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. मुंबईला निघालेल्या जरांगे यांनी सध्या नमती भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.








