भुसावळसह बोदवडला प्राध्यापकांनी काळ्यात फिती लावून केले काम

युजीसी अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची भुसावळसह बोदवडला मागणी


Bhusawal along with Bodwadla professors worked with black ribbons भुसावळ : भुसावळसह बोदवड महाविद्यालयात एन.मुक्टो.स्थानिक शाखेच्या प्राध्यापकांनी शासनाकडे असलेल्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, 26 रोजी महाविद्यालयात काळी फिती लावून कामकाज केले व शासनाच्या दिरंगाईबद्दल निषेध नोंदविला.

बोदवडला सर्व सदस्यांचा पाठिंबा
बोदवड : एम.फुक्टो आणि ए.आय.फुक्टो या प्राध्यापकांच्या प्रश्न सोडवण्यार्‍या संघटनेच्या दिशानिर्देशानुसार प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. याप्रसंगी स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ.चेतनकुमार शर्मा, सचिव डॉ.नरेंद्र जोशी, डॉ.रत्ना जवरस, डॉ.रुपेश मोरे, कंचन दमाडे, हेमलता कोटेचा, नितेश सावदेकर, डॉ.गीता पाटील सहभागी झाले. आंदोलनाला नेट, सेट, पीएचडी संघर्ष समिती स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ.ईश्वर म्हसलेकर सचिव अजित पाटील तसेच सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला.




नाहाटा महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ : कला विज्ञान व पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील एन.मुक्टो स्थानिक शाखेतर्फे काळ्याफिती लावून कामकाज करण्यात आले. 18 जुलै 2018 च्या यूजीसीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, प्राध्यापकांना पदोन्नतीचे लाभ द्यावे, प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, तक्रार निवारण कक्षाची स्थापना करावी तसेच नवीन प्राध्यापक भरती शंभर टक्के करावी आदी मागण्या करण्यात आल्या. पाच टप्प्यात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. आंदोलन प्रसंगी स्थानिक शाखेचे बहुसंख्य सभासद प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते. आंदोलनासाठी एन.मुक्टोचे केंद्रीय प्रतिनिधी आधीसभा सदस्य प्रा.ई.जी.नेहते, एन.मुक्टोचे शाखा पदाधिकारी तसेच जळगाव जिल्हा सचिव प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले स्थानिक शाखेच्या सर्व कार्यकारणी सदस्यांनी सहकार्य केले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !