भाजपा सहकार आघाडी जिल्हाध्यक्षपदी राकेश फेगडे
Rakesh Fegde as district president of BJP Sahakar Aghadi भुसावळ : भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीची जिल्हा कार्यकारीणी नूतन जिल्हाध्यक्ष राकेश फेगडे यांनी नुकतीच जाहीर केली. सरचिटणीसपदी अजय जहांगीरदार व सुनील वाणी तर उपाध्यक्ष म्हणून मंगलसिंग पाटील, नितीन पाटील, रामभाऊ पाटील, चिटणीस वासुदेव बोंडे, लक्ष्मण पाटील, कैलास महाजन तसेच सदस्य म्हणून विलास महाजन, नंदू पाटील, महेश पाटील, यशवंत चौधरी, कमलाकर चौधरी, भागवत महाजन, गिरीश पाटील, कैलास सोनवणे, अनिल पाटील, विश्वास सोनवणे, प्रकाश चौधरी, जयपाल बोदडे यांची कार्यकारीणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
नूतन पदाधिकार्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकार्यांचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, डॉ.राजेंद्र फडके, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन, अशोक कांडेलकर, अजय भोळे, हर्षल पाटील, हिराभाऊ चौधरी, डॉ.केतकी पाटील, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, परीक्षीत बर्हाटे, आतीश झाल्टे, हरलाल कोळी, वैशाली कुलकर्णी यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








