भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी मगन बाविस्कर
Magan Baviskar as District President of Bharatiya Janata Party Scheduled Tribe Morcha भुसावळ : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाची जिल्हा कार्यकारणी नूतन जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर यांनी जाहीर केली. या कार्यकारणीत पाच उपाध्यक्ष, दोन सरचिटणीस तसेच सात चिटणीस आहेत. कार्यकारणीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या अनेक नवीन चेहर्यांना संधी देण्यात आली.
अशी आहे कार्यकारीणी
सरचिटणीसपदी सालुसिंग शिवाळे व अमित तडवी तर उपाध्यक्ष म्हणून हबीब तडवी, मधुकर पारधी, जलाल तडवी, भाईदास कोळी, इकबाल तडवी, चिटणीसपदी प्रकाश भोलानकर, महेंद्रसिंग ठाकूर, जुम्मा तडवी, दीपक तोरे, हुसेन तडवी, जयराम कोळी, फिरोज तडवी व कोषाध्यक्षपदी सलीम बाबू तडवी, सोशल मीडिया प्रमुखपदी योगेश शंखपाळ तसेच सदस्य म्हणून विलास धांडे, अमिन तडवी, संदीप महाले यांची निवड करण्यात आली आहे. कायम नियंत्रित सदस्यपदी मीना तडवी, अशोक कांडेलकर, प्रयाग कोळी, नजमा तडवी, भरत बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली.



नवनियुक्त पदाधिकार्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
नवनियुक्त पदाधिकार्यांचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, डॉ.राजेंद्र फडके, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन, अशोक कांडेलकर, अजय भोळे, हर्षल पाटील, हिराभाऊ चौधरी, डॉ.केतकी पाटील, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, परीक्षीत बर्हाटे, आतीश झाल्टे, हरलाल कोळी, वैशाली कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.





