भुसावळात बिसारा लेडीज इक्वॅलिटी रनच्या पदक व टी-शर्टचे अनावरण


Bisara Ladies Equality Run medal and t-shirt unveiling at Bhusawal भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन आयोजित लेडीज इक्वलिटी रन 3 मार्च रोजी शहरातील कोरोनेशन क्लबच्या क्रीडांगणावर होत आहे. स्पर्धेसाठी 475 महिलांनी नावनोंदणी केली असून स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणार्‍या र्टी शर्ट सह पदकाचे अनावरण करण्यात आले. 2 मार्च रोजी आयएमए हॉल येथून टी-शर्ट वितरीत केला जाणार असून 3 मार्च रोजी रन यशस्वी पूर्ण केल्यानंतर कोरोनेशन क्लबच्या क्रीडांगणावर पदक बहाल केले जाणार आहे.

अनावरणप्रसंगी यांची उपस्थिती
टी-शर्ट व पदक अनावरण रेल्वे क्रीडांगणावर जळगावच्या सुप्रसिद्ध धावपटू व लेडीज इक्वॅलिटी रनच्या प्रथम सत्र 2020 च्या सदिच्छादूत डॉ.सोनाली राहुल महाजन, लेडीज इक्वॅलिटी रनच्या या वर्षीच्या सदिच्छादूत डॉ.रती महाजन, 2022 सालच्या सदिच्छादूत प्रेमलता सिंग, भेल इंडिया लिमिटेडचे मुख्य प्रबंधक दिनेश जावळ, हॉटेल मल्हार व माय फिटनेस जिमचे संचालक प्रमोद धनगर, कुकरेजा सुपर शॉपीचे संचालक संजय कुकरेजा, डॉ.उमाकांत चौधरी, भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रवीण फालक, डॉ.चारुलता पाटील, असोसिएशनच्या नियमित धावपटू माधुरी चौधरी, रीना परदेशी व प्रवीण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.




यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
डॉ.सोनाली महाजन, प्रेमलता सिंग, विद्या बेंडाळे, डॉ.रती महाजन या चारही सदिच्छादूतांचा असोसिएशनच्या वतीने डॉ.चारुलता पाटील यांनी विशेष स्मृतीचिन्ह देऊन गौरव केला. लेडीज रनच्या सर्व 13 सराव सत्रांना उपस्थित असलेल्या रीना परदेशी, मनीषा सिंग व माधुरी चौधरी या महिला धावपटूंचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शीला कश्यप, किर्ती मोटाळकर, एकता भगत, सुनीता सिंग, सुनीता वाघमारे, गुंजन गुप्ता, चारुलता अजय पाटील या नियमित महिला धावपटूंना देखील सन्मानित करण्यात आले. वैशाली बडगुजर, प्रतिभा कोकांदे , रसिका भोळे, अद्विका या धावपटू देखील उपस्थित होत्या. आभार प्रवीण पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी संजय भदाणे, स्वाती फालक, पुनम कुलकर्णी, छोटू गवळी यांचे सहकार्य लाभले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !