आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश : जळगाव जिल्ह्यातील विमा योजनेची सहा हजार 686 प्रकरणे पात्र


मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत पीक विमा न मिळालेल्या दहा हजार सहाशे एकोणवीस प्रकरणांबाबत आवाज उचलल्याची दखल घेत विमा कंपनीने सहा हजार 686 प्रकरणे पात्र ठरवल्याने पीक विमा लाभार्थींमध्ये आनंद पसरला आहे.

आमदारांच्या प्रयत्नांना यश
जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना 2022-2023 अंतर्गत जवळपास 78 हजार शेतकर्‍यांनी जिल्ह्यात पीक विमा काढला होता. त्यापैकी 43 हजार 667 एव्हढ्या शेतकर्‍यांच्या खात्यावर विम्याची रक्कम भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत अदा करण्यात आल्याचे सांगण्यात आले मात्र प्रत्यक्षात 32 हजार 500 शेतकर्‍यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली होती. 11 हजार 167 शेतकर्‍याची रक्कम अजूनही जमा झाली नव्हती तर 78 हजार पीक विमा काढलेल्या शेतकर्‍यांपैकी दहा हजार सहाशे एकोणवीस शेतकर्‍यांची प्रकरणे कृषी विमा कंपनीने ‘शेतात पीक नाही’ असा शेरा मारून रीजेक्ट केली होती. प्रत्यक्षात शेतकर्‍यांनी ज्या वेळेस पीक विमा काढला तेव्हा केळी व इतर पिके यांची लागवड केली होती परंतु कंपनीच्या अशा धोरणामुळे हजारो शेतकरी त्यांच्या हक्काच्या पीक विम्याच्या रकमेपासून वंचित ठरले होते शिवाय ओव्हर इन्शुरन्सच्या नावाखाली 11 हजार 360 शेतकर्‍यांची प्रकरणे प्रलंबित होती. शेतकर्‍यांनी पीक विमा काढताना जितके क्षेत्र दाखवलेले आहे तितकीच लागवड त्यांनी प्रत्यक्षात केल्याचा लक्षवेधी मुद्दा आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत मांडत शासनाकडे न्यायाची मागणी केली होती.




सहा हजार 686 शेतकर्‍यांची पीक विमा प्रकरणे पात्र
अपात्र प्रकरणांपैकी सहा हजार 686 शेतकर्‍यांची पीक विमा प्रकरणे पात्र ठरली आहेत तर मुक्ताईनगर मतदारसंघातील रावेर तालुक्यातील चार हजार 585 पैकी दोन 912 तर मुक्ताईनगर तालुक्यातील 595 पैकी 231 तसेच बोदवड तालुक्यातील 10 पैकी एक प्रकरण पात्र ठरले असून एकूण तीन हजार 144 प्रकरणे पात्र ठरल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संपर्क कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !