उपप्रादेशिक कार्यालय भुसावळला मंजूर करा ; सुनील काळे


Grant to Sub Regional Office Bhusawal ; Sunil Kale भुसावळ : उपप्रादेशिक कार्यालय भुसावळ येथेही मंजूर करावे, अशी मागणी वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली आहे.

तर पाच तालुक्यातील नागरीकांची सोय
मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यातील जनतेला जळगाव जाण्यासाठी अंतर हे जवळपास36 तर 65 किलोमीटरर अंतर आहे त्यामुळे भुसावळ येथे उपप्रादेशिक कार्यालय केल्यास मुक्ताईनगर, बोदवड, रावेर, जामनेर, यावल तालुक्यातील नागरीकांना सोयीचे ठरणार आहे शिवाय भुसावळ हा जिल्हा होण्याच्या मार्गावर आहे. मध्यवर्ती ठिकाण असलेले भुसावळात उपप्रादेशिक कार्यालय मंजूर करावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली. तापी परीसरातील नागरीकांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी निवेदन देऊन केली आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !