लोणपिराचे विकासो चेअरमनपदी रायचंद परदेशी बिनविरोध


Raichand Pardeshi unopposed as Lonpirache development chairman भडगाव : भडगाव तालुक्यातील लोणपिराचे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमनपदी रायचंद शामसिंग परदेशी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब महाले होते. त्यांना प्रेमसिंग पाटील, सचिव संजय पाटील यांनी सहकार्य केले.

बिनविरोध निवडीनंतर जल्लोष
भीमराव ओंकार पाटील यांनी ठरल्याप्रमाणे चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने रीक्त जागेसाठी ही निवड घेण्यात आली. यावेळी नवनिर्वाचीत चेअरमन रायचंद परदेशी यांचा संचालक मंडळ व ग्रामस्थांमार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब पाटील, संचालक प्रदीप पाटील, सुरेश खैरे, भीमराव पाटील, प्रभाकर पाटील, विठ्ठल पाटील, सोमनाथ पाटील, दीपक पाटील, वसंत पाटील, सरस्वताबाई पाटील, अरुणाबाई पाटील, शंकर पाटील, सरदारसिंग परदेशी (घुसर्डी खुर्द), लोणपिराचे येथील सुरेश पाटील, विजय पाटील, गोविंदा पाटील, बोदर्डे येथील वाल्मीक पाटील, सतीलाल पाटील, नाना पाटील, भालेराव पाटील, गोविंदा पाटील यांच्यासह लोणपिराचे, घुसर्डी खुर्द, बोरनार, बोदर्डे येथील नागरीक तसेच संस्थेचे कर्मचारी परशुराम पाटील उपस्थित होते.




पत्रकाराने केला सन्मान
नवनिर्वाचित चेअरमन रायचंद परदेशी यांच्या निवासस्थानी पत्रकार अशोक परदेशी यांनी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी भीमसिंग पाटील, गजानन पाटील, माजी सरपंच गोरख परदेशी, अविनाश परदेशी, जितेंद्र परदेशी, दीपक परदेशी यांच्यासह मित्र परीवार उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !