यावलला शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींचे स्वागत : कार्यकर्त्यांशी साधला संवाद
Sambhaji Bhide Guruji, founder of Yavala Shivpratisthan Hindusthan Sanstha, welcomed: interaction with activists यावल : यावल शहरात शनिवारी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांची भेट दिली. श्री महर्षी व्यास मंदिरात कार्यकर्त्यांशी साधला संवाद या प्रसंगी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरात भिडे गुरूजी यांचे स्वागत केले.
व्यास मंदिरात केली पूजा
शहरात शनिवारी सकाळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांचे आगमन झाले. त्यांच्या स्वागताकरीता सकाळपासून कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली. शहरातील बोरावल गेट येथील शिवतीर्थ येथे भिडे गुरूजी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन पूजन करण्यात आले व भिडे गुरूजी यांनी त्यांचे जुने सहकारी स्वर्गीय बाळकृष्ण पांडुरंग शिर्के यांच्या घरी भेट दिली. तेथून विविध घोषणा देत कार्यकर्त्यांच्या समवेत भिडे गुरुजी हे श्री महर्षी व्यास नगरात पोहचले. मंदिरात भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, डॉ.कुंदन फेगडे, डॉ.अभय रावते, नरेंद्र शिंदे, सागर देवांग, राजेश करांडे, उजैन्नसिंग राजपूत, जितेंद्र शिर्के, शैलेंद्र शिर्के, मधुकर शिर्के सह आदींनी त्यांचे शहरात स्वागत केले. मंदिरात मंदिर संस्थानचे शशिकांत देशमुख, एस.के. बाऊस्कर सह सर्व मंदिर संस्थान पदाधिकार्यांची मंदिरात उपस्थिती होती. येथे उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भिडे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.



धनंजय चौधरींच्या उपस्थितीने चर्चा
श्री महर्षी व्यास मंदिरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या भेटी करीता आमदार शिरिष चौधरी यांचेे पुत्र तथा काँग्रेस एनएसयुआयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की शहरात येणार्या भिडे गुरूजीची भेट आमदारांनी घ्यावी मात्र अधिवेशन सुरू असल्याने त्यांचा प्रतिनिधी म्हणून आपण येथे उपस्थित होतो असे धनंजय चौधरी यांनी सांगितले.





