उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठार मारण्याची धमकी ; संशयिताला अटक


Threat to kill Deputy Chief Minister Devendra Fadnavis ;  Suspect arrested मुंबई : एका स्थानिक वाहिनीवरील मुलाखतीतून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित किंचक नवले (34) यास सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक केली आहे.

आरोपीला 7 पर्यंत पोलीस कोठडी
सांताक्रूझ पोलिसांनी नवले याचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता तो सातार्‍याच्या हद्दीत असलेल्या ‘हॉटेल सेव्हन 11’ मध्ये थांबल्याची माहिती स्पष्ट होताच परीमंडळ 9 चे पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन आणि वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने नवले याचा गाशा गुंडाळला. किंचक नवले याला न्यायालयाने 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !