भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चिटणीसपदी सुमित बर्हाटे तर जिल्हाध्यक्षपदी निलेश चव्हाण
Bharatiya Janata Party Yuva Morcha Secretary Sumit Barhate and District President Nilesh Chavan भुसावळ : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारीणी नूतन जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण यांनी जाहीर केली. या कार्यकारीणीत 10 उपाध्यक्ष, चार सरचिटणीस तसेच 11 चिटणीसांचा समावेश आहे.
अशी आहे नूतन कार्यकारीणी
कार्यकारणीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्व जिल्ह्याचा संघटनात्मक समतोल साधल्याचे दिसत आहे.



कार्यकारणीत सरचिटणीसपदी जितेंद्र कोळी, संदीप सावळे, संदीप पाटील, पवन पाटील यांची वर्णी लागली आहे तर उपाध्यक्ष म्हणून स्नेहदीप गरुड, सागर भारंबे, मुरलीधर पाटील, भूषण नेहते, राम आहुजा, मुकेश पाटील, मेघराज नाईक, सोपान झाल्टे, रहस्य महाजन, चिटणीसपदी शुभम पाटील, विशाल भोई, भूषण फेगडे, विक्रम वरकड, दीपक पाटील, वैभव राजपूत, जीवन राणे, सुमित बर्हाटे, भरत पाटील, अक्षय सरोदे, मयूर बडगुजर तर सोशल मीडिया प्रमुख पदी अजिंक्य वाणी तसेच सदस्य म्हणून अजय भालेराव, गोपाल बरकले, चंदू ठाकरे, मनोज घाटे, संदीप पाटील, सुनील शिंपी यांची युवा मोर्चा कार्यकारणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकार्यांचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी कौतुक केले आहे.





