यावल तालुका राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदी रीतेश उर्फ रॉकी पाटील यांची निवड


Election of Ritesh alias Rocky Patil as Nationalist Taluka President of Yaval Taluka यावल : यावल तालुका राष्ट्रवादी अजित पवार गटाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तालुकाध्यक्ष म्हणून रीतेश उर्फ रॉकी पाटील यांची निवड करण्यात आली. ही निवड भुसावळ येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी करीत नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी युवक तालुकाध्यक्षपदी आकाश चोपडे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, उपजिल्हाध्यक्ष गुणवंत निळ, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सोनवणे, युवक जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाटील, युवक जिल्हा सरचिटणीस जुगल पाटील, यावल शहराध्यक्ष राजू करांडे, तालुका कार्याध्यक्ष जितेंद्र सोनवणे, शहर उपाध्यक्ष चेतन सपकाळे सह आदींची उपस्थिती होती.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !