मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्ह्यात : जाणून घ्या नेमके कार्यक्रम
जळगाव : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
असे आहेत कार्यक्रम
सोमवार, 4 रोजी सकाळी 10.30 वाजता जळगाव विमानतळावर त्यांचे आगमन होईल व हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालय हेलिपॅड, वाशिमकडे प्रयाण करतील. दुपारी 3.55 वाजता वाशिम येथून हेलिकॉप्टरने मौजे मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे आगमन होईल व तेथून मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण तर दुपारी चार वाजता मौजे मुंढाळदे (खडकाचे) ता. मुक्ताईनगर ते सुलवाडी ऐनपूर, ता.रावेर, जि.जळगाव या दोन तालुक्यांना जोडणार्या तापी नदीवरील पुलाचे बांधकामाचे भूमिपूजन ते करतील.



सायंकाळी 4.45 वाजता आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, सायंकाळी पाच वाजता कोथळी, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे श्री संत मुक्ताई मंदिरात दर्शन, सायंकाळी 5.10 वा. मोटारीने मौज मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड, ता मुक्ताईनगर, जि.जळगावकडे प्रयाण, सायं. 5.15 वाजता मौज मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे आगमन व हेलिकॉप्टरने जळगावकडे प्रयाण तर सायंकाळी 5.40 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने खेडी जळगावकडे प्रयाण, सायंकाळी 5.55 वाजता खेडी जळगाव येथे आगमन व वारकरी भवनाचे भूमिपुजन सोहळा, सायंकाळी 6.10 वाजता मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण तर सायंकाळी 6.20 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण करतील.





