जळगाव विमान तळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालकमंत्र्यांनी केले स्वागत
The Guardian Minister welcomed Chief Minister Eknath Shinde at Jalgaon Air Base
जळगाव : जळगाव व वाशिम दौर्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले.
यांयची होती उपस्थिती
यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाशिम आणि जळगाव जिल्ह्याचा दौरा असून जळगाव विमानतळावरून ते हेलिकॉप्टर वाशिम जिल्ह्याच्या दौर्यासाठी रवाना झाले. यावेळी त्यांच्या समवेत पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते.








