जळगावात गृहमंत्री अमित शहा उद्या युवकांशी साधणार संवाद


जळगाव : देशाचे कणखर नेतृत्व, तेजस्वी गृह व सहकार मंत्री अमित शहा हे मंगळवार, 5 मार्च रोजी जळगाव दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन आदी उपस्थित राहणार आहेत.

सागर पार्कवर युवा संमेलन
मंगळवार, 5 मार्च रोजी दुपारी एक वाजता जळगावातील सागर पार्क येथे गृहमंत्री युवकांशी संवाद साधणार आहे. या भव्य युवा संवाद सभेला उत्तर महाराष्ट्र विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी व युवा नवमतदार युवक-युवती उपस्थित राहतील. या भव्य-दिव्य युवा संवाद सभेसाठी जिल्ह्यातील सर्व युवकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष अमोलदादा जावळे, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे यांनी केले असल्याचे भाजपा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संदीप पंडितराव सुरवाडे कळवतात.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !