यावल शहरात चार हजार 202 बालकांना पाजले पोलिओ डोस
यावल : यावल ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने रविवारी यावल शहरात 16 बूथ द्वारे चार हजार 202 बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले. शहरात 0 ते 5 वर्षीय वयोगटातील चार हजार 462 बालकांना डोस देण्याचे नियोजन होते हे उद्दिष्ट 94 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत बालकांना घरोघरी जावून विशेष मोहिम राबवत डोस दिले जाणार आहे.
चार हजार 462 बालकांना डोस
यावल शहरात ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने रविवारी विविध ठिकाणी 16 पोलिओ बूथ उभारणी करून सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत 0 ते 5 वर्षीय बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले. यावल शहरात विविध भागात तसेच बस स्थानकावरदेखील पोलिओ डोस पाजण्यासाठी बुथ लावण्यात आले. यावल शहरात चार हजार 462 बालकांना डोस देण्याचे नियोजन ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्यापैकी चार हजार 202 बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला आहे. हा उपक्रम वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय कुरकुरे, डॉ.प्रशांत जावळे, डॉ.सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिपरीचारीका ज्योत्स्ना निंबाळकर, जॉन्सन सोरटे, आरोग्य सेविका वैशाली बैरागी, सुमन राऊत, संगीता गावीत, पूनम सोनवणे, रवींद्र माळी, कांचन चौधरी, रेणुका वाघ, कादर तडवी, वसंतकुमार सदानशिव, बापू महाजन, अमोल अडकमोल आदींनी राबवला.








