अंतर्नादच्या प्रतिष्ठानच्या महावक्तृत्व स्पर्धेतून भविष्यात तयार होतील बालवक्ते

अंतर्नाद प्रतिष्ठान आयोजित जिल्ह्यास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात मान्यवरांचा सूर.


Children’s orators will be prepared from the public speaking competition of Antaranad’s foundation भुसावळ : शिवाजी महाराजांच्या प्रथम गुरु जिजाबाई होत्या त्यांनीच शिवरायाना घडवले. आपल्या मुलांशी रोज संवाद साधा. संस्कार हे करायचे नसतात तर आपल्या कृतीतूनच होत असतात. पालकांनी आपल्या मुलांचे मित्र झाले पाहिजे, अश्या भावना या प्रसंगी तहसीलदार नीता लबडे यांनी व्यक्त केल्या. अंतर्नाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजयंतीच्या निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात जळगाव जिल्हास्तरीय महावक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यंदा स्पर्धेचे सातवे वर्ष होते. स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील 459 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
प्रथम फेरी 25 फेब्रुवारीला घेण्यात आली होती. अंतिम फेरी बक्षीस वितरणा पूर्वी घेण्यात आली होती. यंदा स्पर्धेचे सातवे वर्ष होते. पाच गटातील 25 विजेत्यासह सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक यांना रविवार, 3 रोजी गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार नीता लबडे, ताप्ती एजुकेशन सोसायटीचे चेअरमन मोहन फालक, श्रीकांत जोशी, दिनकर जावळे, सुरेश अहिरे यांची उपस्थिती होती.




अंतिम फेरी नाहाटा महाविद्यालयात
शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित वकृत्व स्पर्धेतील पाच गटातील प्रत्येकी 15 विद्यार्थी यानुसार 75 विद्यार्थ्यांची अंतिम फेरी नाहाटा महाविद्यालय लायब्ररी हॉल येथे रविवारी पार पडली. परीक्षक म्हणून शैलेंद्र वासकर, प्रा.गौतम भालेराव, प्रा.संदीप नेतनराव, प्रा.महेश गोसावी, श्रीश चिपळोणकर, प्रा.निलेश गुरुचल, तृप्तीराम करणकाळ यांनी काम पाहिले. अंतिम फेरी झाल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला. प्रथम बक्षीस रोख सातशे रुपये, द्वितीय पाचशे आणि तृतीय तीनशे रुपये यासह सन्मानचिन्ह, प्रमाण पत्र, आणि पुस्तक असे बक्षिसाचे स्वरूप होते. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख देव सरकटे यांनी केले.शिक्षण आणि सामाजीक क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल राजू वारके, प्रा.डॉ.श्यामकुमार दुसाने, आणो गोसेवक रोहित महाले यांचा अंतर्नादतर्फे सन्मानपत्र देउन गौरव करण्यात आला. त्यानंतर स्पर्धेच्या 40 परीक्षकांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन जीवन महाजन तर आभार प्रदीप सोनवणे यांनी मानले. सन्मानपत्राचे वाचन शैलेंद्र महाजन, अमितकुमार पाटील, विक्रांत चौधरी यांनी केले. यशस्वीतेसाठी समन्वयक समाधान जाधव, सह समन्वयक अमित चौधरी, सचिन पाटील, ज्ञानेश्वर घुले, राजेंद्र जावळे, तेजेंद्र महाजन, चंद्रकांत सूर्यवंशी आणि अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

गटनिहाय अंतिम फेरीतील विजेते
पहिला गट (इयत्ता पहिली-दुसरी)
प्रथम- आराध्या गणेश पाटील (गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील विद्यालय, जळगाव), द्वितीय- निधिका राधेश्याम पाटील (जि.प.शाळा, सांगवी, ता.यावल), तृतीय- कार्तिकी निलेश पाटील (ओरीअन सीबीएससी स्कूल, जळगाव), उत्तेजनार्थ गार्गी ललितकुमार भोळे (सेंट अलॉयसेस स्कूल, भुसावळ), तृप्ती महादू कोळी (बालविकास विद्या मंदिर, भडगाव)

द्वितीय गट ( इयत्ता तिसरी व चौथी)- प्रथम- काव्या आनंद फेगडे (जी.पी.व्ही.स्कूल, जळगाव), द्वितीय- अनुश्री अनिल चौधरी (गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील विद्यालय, जळगाव), तृतीय ऋतुजा मनोज सरोदे (जि.प.मुलींची शाळा, लोहारा), उत्तेजनार्थ- लोकशंदा रुपेश महाजन (जी.पी.व्ही.स्कूल, जळगाव), स्तव्य कमलेश शामकुमार (पोदार इंटरनॅशनल स्कुल, भुसावळ)

तृतीय गट ( इयत्ता 5 वी ते 7 वी )
प्रथम विधी गजाजन किनगे ( काशिनाथ पलोड पब्लिक स्कुल, जळगाव ), द्वितीय वेदिका ईश्वर पाटील ( नूतन माध्यमिक विद्यामंदिर, कापूसवाड, बोदवड ) , तृतीय चिराग डिगंबर श्रीखंडे ( भारत विद्यालय, न्हावी ), उत्तेजनार्थ गायत्री शरद तांदळे (जि.प. शाळा दापोरे, जळगाव ), वराड भरत फेगडे ( महाराणा प्रताप विद्यामंदिर, भुसावळ )

चतुर्थ गट ( इयत्ता 8 वी ते 10 वी )
प्रथम धनश्री नंदकिशोर मेहकर ( बी.एम. विद्यालय शेलवड, बोदवड ), द्वितीय कुंजल दीपक दलाल ( प.न.लुंकड कन्याशाळा, जळगाव ), तृतीय कुलदीप रवींद्र पाटील ( सेंट अलॉयसेस स्कुल, भुसावळ), उत्तेजनार्थ श्रद्धा विजय निकम ( आदर्श कन्या विद्यालय भडगाव ), लिसीका कुंदन पाटील ( के नारखेडे विद्यालय, भुसावळ)

पाचवा गट (खुला गट)- प्रथम- शंकर रघुनाथ भामेरे ( शिक्षक, सावित्रीबाई माध्यमिक विद्यालय, पहूर, जामनेर), द्वितीय- कोमल चंद्रकांत शिरसाळे (एम.जे.कॉलेज, जळगाव), तृतीय रवींद्र प्रकाश पाटील (शिक्षक, जि.प.शाळा बोरावल, यावल), उत्तेजनार्थ- लीना संजीव सपकाळे (पी.के.कोटेचा महाविद्यालय, भुसावळ), विवेक पाटील (कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यालय जळगाव)








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !