भुसावळात लोकअदालतीत 55 प्रकरणात तडजोड


Compromise in 55 cases in Lok Adalat in Bhusawal भुसावळ : अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित महा लोकअदालतीत एक कोटी 78 लाख रुपयांची वसूली झाली तर एकूण 55 प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली. दिवाणी दाव्यांसह मोटार अपघात दाव्यांचा यात समावेश आहे. लोकअदालतीसाठी एकूण तीन पॅनल गठीत करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
जिल्हा न्यायाधीश व्ही.सी.बर्डे, वरीष्ठ स्तर न्या.आर.एस.पाजणकर, प्रथमवर्ग न्या.एस.व्ही.जंगमस्वामी तसेच पॅनल अ‍ॅड.संजीव पांडव, अ‍ॅड.पिंजारी, अ‍ॅड.चित्रा आचार्य, अ‍ॅड.नितीन खरे, अ‍ॅड.सुशील बर्गे, अ‍ॅड.किर्ती सोनवणे, अ‍ॅड.विश्वंभर वाणी तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या लोक अदालतीसाठी न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक विजय तायडे, लिपिक कमलाकर जावळे, सतीश पाटील, राकेश शिंदे तसेच न्यायालयीन कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !