शासन योजना पोहोचणार्या महिलांचे योगदान महत्त्वाचे : आमदार संजय सावकारे
शासन योजना पोहोचणार्या महिलांचे योगदान महत्त्वाचे : आमदार संजय सावकारे
Contribution of women in reaching the government scheme is important : MLA Sanjay Savkare भुसावळ : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळ व भाजपा महिला मोर्चातर्फे नारीशक्ती वंदन व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात करण्यात आले. प्रसंगी सर्व सी.आर.पी.महिलांचा सत्कार करण्यात आला. नेहमीच शासनाने दिलेली कामे अत्यंत प्रामाणिकपणे करणार्या व शासनाच्या योजना घराघरात पोहचवणार्या या महिलांचे योगदान महत्वाचे असल्याचे विचार आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, रजनी सावकारे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष युवराज लोणारी, संजय पाटील, परीक्षीत बर्हाटे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रंजना पाटील, कथोरा सरपंच रोहिणी पाटील, मीना लोणारी, सोनल महाजन, प्रीतमा महाजन, दीपाली बर्हाटे , माजी सभापती प्रीती पाटील, मनीषा पाटील, वंदना उन्हाळे, अनिता सपकाळे, रेखा सोनवणे, रेखा बोंडे, सारीका चौहान, बेलव्हाय सरपंच खाचणे उपस्थित होत्या. प्रसंगी राहुल ठोसर यांनी उपस्थित महिलांना राज्य व केंद्रशासनाच्या वेगवेगगळ्या योजनांची माहिती दिली.



यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
प्रास्ताविक प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी केले. दरवर्षी मंडळातर्फे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात अंगणवाडीत सेविका, मदतनीस, आशा व सी.आर.पी. यांचा यथोचित सन्मान करून कृतघ्नता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातो तसेच शासनाच्या योजनांची माहिती देवून महिलांना जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो, असे प्रसंगी सावकारे म्हणाल्या. सूत्रसूत्रंचालन राजश्री देशमुख यांनी केले. यशस्वीतेसाठी अनिता आंबेकर, सोनल महाजन, जयश्री चौधरी, वैशाली भगत, वैशाली सैत्वाल, पल्लवी वारके, रंजना परदेशी यांनी परिश्रम घेतले.





