भुसावळात 8 रोजी नुपूर महोत्सवाचे आयोजन


Nupur festival organized on 8th in Bhusawal भुसावळ : नुपूर कथक डान्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही शुक्रवार, 8 आठ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त नुपूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजता शहरातील डॉ.बी.व्ही.खाचणे हॉल, नंदनवन कॉलनी, स्वामी समर्थ केंद्राजवळ नृत्यशिक्षीका चारू भालेराव या आपल्या विद्यार्थ्यांसोबत कथक नृत्य सादर करतील.

भुसावळकरांना लाभ घेण्याचे आवाहन
बेंगळुरू (कर्नाटक) येथील श्रीनिवासन राजेंद्र हे यक्षगान हा नृत्यप्रकार सादर करतील. हा महोत्सव शास्त्रीय नृत्याचा असल्याने या पूर्वी भरतनाट्यम, ओडिसी, कथकली, कुचीपुडी, मोहिनिअट्टमं, मणिपुरी असे अनेक प्रकार सादर झालेत. या कार्यक्रमास सर्व रसिक नागरिकांनी उपस्थित राहून आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या महोत्सवात राष्ट्रीय स्तरावर शास्त्रीय नृत्याचा प्रचार व प्रसार करणार्‍या कलावंताला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या वर्षी हा पुरस्कार बेंगुळुरू (कर्नाटक) येथील यक्षगान नृत्याकार श्रीनिवासन राजेंद्र यांना घोषित करीत आहोत. पुरस्काराच्या स्वरूपात शाल ,श्रीफळ,आणि मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !