खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याचे धमकी


Death threat to MP Navneet Rana अमरावती : खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याचे धमकी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ही धमकी पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान येथून देण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. धमकीची तक्रार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली आहे.

राणा यांचा गंभीर आरोप
एमआयआमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच नवनीत राणा यांना धमकी आल्याचा दावा देखील आमदार रवी राणा यांनी केला आहे. नवनीत राणा या लोकसभेमध्ये हिंदू समाजाची बाजू मांडत असल्याने त्यांना ही धमकी आल्याचा दावा देखील आमदार रवी राणा यांनी केला.




अमरावतीच्या खासदार असलेल्या नवनीत राणा या आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दरम्यान गेल्या काही दिवसात त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. त्यामुळे आगामी काळात त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच नवनीत राणा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दरम्यान आता नवनीत राणा यांना पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान मधून धमकी आली आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !