चुकवू नये एैसे काही : भुसावळ शहरात 9 रोजी ‘आई-बाप समजून घेताना’ विषयावर व्याख्यान
Something not to be missed : Lecture on ‘Understanding parents’ on 9th in Bhusawal city
भुसावळ : कुमारवयीन किशोर मुला-मुलींचे भरकटण्याचे प्रमाण वाढले असून मुला-मुलींना आई-वडिलांचे संस्कार, त्यांची आपल्या मुलांप्रती असलेली तळमळ व पालकांच्या प्रेमाचे महत्व कळण्यासाठी भारत विकास परिषद, शाखा भुसावळतर्फे शनिवार, 9 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संतोषी माता हॉलजवळील, मातृभूमी चौकाजवळ समाजप्रबोधनकार व युवा व्याख्याते वसंत हंकारे यांचे ‘आई बाप समजावून घेताना व जगूया चला आनंदाने’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
यांची राहणार उपस्थिती
अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील असतील. यावेळी आमदार संजय सावकारे, तापी चेअरमन महेश फालक, उद्योजक मनोज बियाणी, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, माजी नगरसेवक पिंटू कोठारी, रोहित कोलते, मकरंद नारखेडे आदींची उपस्थिती राहणार आहे. भुसावळकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष सतीश खडायते, सचिव हरीष कोल्हे, प्रांत उपाध्यक्ष योगेश मांडे, कार्यक्रम प्रमुख डॉ.निलीमा नेहेते यांनी केले आहे.








