कन्या जन्माच्या स्वागतासह लेवा समाजातील गरीब मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार !
भुसावळ भोरगाव लेवा पाटीदार शाखेचा स्तुत्य निर्णय
Lewa will bear the cost of the education of poor girls in the community with the welcome of the birth of a daughter! भुसावळ : समाजातील घटत्या मुलींच्या प्रमाणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून अनेक तरुणांवर अविवाहित राहण्याची वेळ आली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी लेवा पाटील समाज कन्या जन्माचे स्वागत करणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेने बैठक घेऊन त्याबाबत निर्णय जाहीर केला.
गोरगरीब कुटूंबातील मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार
कोविड 19 मुळे अनेक कुटुंबीयांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांची आर्थिक परीस्थिती हालाखीची झाली आहे. या समस्येवर उपाय म्हणून भोरगाव लेवा पंचायत विभाग, भुसावळ यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये अध्यक्ष अॅड.प्रकाश पाटील यांनी हा ठराव मांडला. जानेवारी 2019 नंतर जन्मलेल्या आलेल्या गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाचा व लग्नाचा खर्च समाज करणार आहे. समाजातील सामाजिक काम करणार्या सर्व संस्था व समाजातील भातृमंडळे यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. बैठकीला अध्यक्ष अॅड.प्रकाश पाटील, सचिव डॉ.बाळू पाटील, शरद फेगडे, चेतन पाटील, नितीन धांडे, आरती चौधरी, स्वाती भोळे उपस्थित होत्या. हा उपक्रम कुटुंबनायक रमेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.








