सावदा शहरातील ग्रामीण रुग्णालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे

माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


A rural hospital in Sawda town should be named after Chhatrapati Shivaji Maharaj सावदा : सावदा शहरातील उपजिल्हा रुग्णालयास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी 4 रोजी मुक्ताईनगर येथे विकासकामे भूमिपूजन सोहळ्यास आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी दिले व नामकरण लवकरात-लवकर करावी अशी मागणी केली.

भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्र्यांना निवेदन
विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यास मुक्ताईनगरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, सावदा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. रुग्णालयाच्या जागी पूर्वी सावदा नगरपालिकेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय होते त्यानंतर सन 2010 मध्ये हीच जागा शासनास उपजिल्हा रुग्णालय उभारणीसाठी कोणताही मोबदला न घेता सुपूर्द करण्यात आली होती त्याच वेळी येथे उभारण्यात येणार्‍या रुग्णालयास पूर्वी प्रमाणे राजे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, असे नाव देण्यात यावे, असा ठराव नगरपालिकेतर्फे करण्यात आला होता व त्याच ठरावास अनुसरून आता या ग्रामीण रुग्णालयास राजे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, असे नामकरण त्वरीत करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची स्वाक्षरी आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !