तांत्रिकदृष्ट्याही महिलांनी सक्षम व्हावे : आमदार संजय सावकारे


Women should also be technically empowered : MLA Sanjay Savkare भुसावळ : शासनाने पुरविलेल्या मोबाईलचा वापर करून सर्व योजनांची योग्य ती माहिती भरावी आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावे तसेच लेक लाडकी योजना सर्वांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी येथे केले. शहर व ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांना मोबाईल वितरण व सत्कारप्रसंगी आमदार बोलत होते. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भुसावळ तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार तसेच मोबाईल वितरण महिला व बालविकास विभागातर्फे भुसावळ पंचायत समितीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शुक्रवारी करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या भुसावळ अध्यक्ष आणि समाजसेविका रजनी संजय सावकारे होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे, पंचायत समिती भुसावळ सहाय्यक गटविकास अधिकारी एस.डी.पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी भुसावळ ग्रामीण एस.जी.रोझतकर, एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या पर्यवेक्षिका
एस.एस.जाधव, पर्यवेक्षिका प्रमिला पावरा, विजय पालवे, ग.स.सोसायटी जळगाव संचालक योगेश इंगळे, नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढी भुसावळ संचालक प्रदीप सोनवणे, कनिष्ठ सहाय्यक राहुल तायडे, सागर पाथरवट, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष समाधान जाधव, तु.स.झोपे उपशिक्षक राहुल भारंबे यांची उपस्थिती होती.


देशाला लाभल्या दोन महिला राष्ट्रपती
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी केलेल्या शैक्षणिक कार्यामुळे देशाला दोन महिला राष्ट्रपती लाभल्या, असे प्रतिपादन रजनी सावकारे यांनी केले. त्या म्हणाल्या की, राजमाता माँ साहेब यांनी शिवाजी राजे यांच्यावर उत्तम संस्कार घडवून स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पूर्ण केले. त्याचप्रमाणे आपण महिला वर्गाने आपल्या मुलांना आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना उत्तम संस्कार दिले पाहिजे. स्त्रियांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे द्वार खुले केले त्यामुळे आज देशाला दोन महिला राष्ट्रपती लाभल्या आणि सावित्रीबाईंनी केलेल्या शिक्षणाच्या महत्त्वपूर्व कार्यामुळे आज महिलावर्ग आकाशात गरुड झेप घेत आहे. त्यांची प्रेरणा, त्यांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजे. त्यासोबतच महात्मा ज्योतिबा फुले यांना विसरून चालणार नाही. त्यांनीच सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिक्षण दिले आणि स्त्रीयांसाठी शिक्षणाचे द्वार खुले केले, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक उपशिक्षक समाधान जाधव यांनी तर आभार उपशिक्षक राहुल भारंबे यांनी मानले. यशस्वीतेसाठी राहुल तायडे, सागर पाथरवट, चेतना गवळी यांनी परिश्रम घेतले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !