मुक्ताई-चांगदेव मंदिरावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

आमदार एकनाथराव खडसे व अ‍ॅड.रोहिणी खडसे यांचा उपक्रम


Flower shower by helicopter at Muktai-Changdev Temple मुक्ताईनगर : श्री संत मुक्ताई यात्रोत्सवासह चांगदेव यात्रोत्सवात खानदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्यप्रदेशातील लाखो वारकरी दाखल झाल्यानंतर महाशिवरात्रीला याचे औचित्य साधून आमदार एकनाथराव खडसे व अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या माध्यमातून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

पुष्पवृष्टीने भाविक भारावले
महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्यातर्फे आदिशक्ती मुक्ताई आणि योगीराज चांगदेव यांच्या पद स्पर्शाने पावन कोथळी, मेहुण, चांगदेव, मुक्ताईनगर या पावन तीर्थक्षेत्रांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. रोहिणी खडसे यांनी हेलिकॉप्टरमधून आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान स्थळ कोथळी, योगीराज चांगदेव मंदिर, आदिशक्ती मुक्ताई मंदिर मेहुण, नवीन आदिशक्ती मुक्ताई मंदिर मुक्ताईनगर या तीर्थस्थानांवर पुष्पवृष्टी केली. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या
महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पावन तीर्थस्थानांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचे आपल्याला भाग्य लाभले. यात्रोत्सवानिमित्त प्रथमच मुक्ताई, चांगदेव मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. उपस्थित वारकरी भाविक भक्तांमध्ये हा नयनरम्य सोहळा कुतूहल आणि औत्सुक्याचा विषय ठरला.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !