भुसावळात नुपूर महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध
कथक, शिवस्तुती सादरीकरणाने मिळवल्या प्रेक्षकांच्या टाळ्या
Enchanted enthusiasts at the Nupur festival in Bhusawal भुसावळ : शहरातील खाचणे हॉलमध्ये महाशिवरात्रीचे औचित्य साधून नुपूर कथक डान्स अॅकेडमीतर्फे नुपूर महोत्सवाचे आयोजन शुक्रवार, 8 मार्च रोजी करण्यात आले. डॉ.छाया चौधरी, किरण फालक, डॉ.व्ही.बी.खाचणे, रमाकांत भालेराव, चारू भालेराव यांच्यास्ते नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन झाले.
सहभागी कलावंतांचा गौरव
रमाकांत भालेराव यांनी प्रास्ताविकात अॅकेडमीच्या कार्याची माहिती दिली. यावेळी स्थानिक युवा चित्रकार चंद्रवीर बेहरा याने तयार केलेले चित्र पाहुणे कलाकार श्रीनिवास राजेंद्र यांना देण्यात आले. यावेळी त्याचा तसेच सुरेखा पांडव, मालती श्रीखंडे, डॉ.गिरीश कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. सर्व सहभागी कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन गौरवण्यात आले. नंतर प्रत्यक्ष सादरीकरणास सुरुवात झाली. यात आदी योगी नमस्तुभ्यं- शांभवी निनावे, भूमिका भोसले, पूर्वी शर्मा, तेजस्वी पाटील, वैभवी गडे तर शिव अनादी हैं- भार्गवी उंबरकर, शानवी चौधरी, शारवी लाहोटी, धनश्री भुरे, नक्षत्रा महाले, सानवी कुंभलकर, माहिता सुरी यांनी सादर केले. नंतर डीमिक डिमिक डमरू बाजे सुनीता दरगड, मीनल पाटील, मधुश्री गायकवाड, भावना कांबळे, अंजली ठाकूर तर शिव तांडव- नुपूर भालेराव हिने सादर करून रसिकांची दाद मिळवली. नंतर ईश गिरीश- यज्ञां पाटील, गार्गी पुसतकर, मानसी टेकवांणी, प्रियांशी जूनागडे, मोक्षदा तळेले, मानवी पवार यांनी सादर केले. नंतर शिवस्तुती – चारू भालेराव यांनी सादर केली. नंतर ओम् नमः शिवाय डमरू पाणी या गाण्यावर मंजू शर्मा, यशस्वी पाटील, जयश्री कनोजिया, पल्लवी महाजन, नम्रता सराफ यांनी नृत्य सादर केले.



यानंतर कथक त्रिताल, परमेलू के प्रकार,परण, चक्रदार परन हे प्रकार लतिका श्रीखंडे, उर्वशी कोळी, हेमांगी पंडागरे, किंजल बार्हे यांनी सादर केले. यानंतर बेंगळुरू (कर्नाटक )येथून आलेल्या श्रीनिवासन राजेंद्र यांनी यक्षगान हा नृत्यप्रकार सादर करून रसिकांची मने जिंकली.य परमेश्वराय शशी शेखराय या गीतावर लतिका श्रीखंडे, उर्वशी कोळी यांनी सादरीकरण केले. सर्व सहभागी विद्यार्थी यांनी एकत्रित शिव शंभू शंभू या गीतावर नृत्य सादर केलं.
श्रीनिवासन यांचा पुरस्काराने सन्मान
श्रीनिवासन राजेंद्र यांना नृत्यश्री पुरस्कार स्वरूपात शाल श्रीफळ व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालन प्रा.डॉ.गिरीश कुलकर्णी तर आभार रमाकांत भालेराव यांनी मानले. यशस्वीतेसाठी झुंझार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे सर्व पदाधिकारी, आशीष सैतवाल, राजेंद्र जावळे, शंभू गोडबोले, शंभू मेहेंदळे, सुरेखा पांडव, मालती श्रीखंडे, प्रकाश फेगडे, ऋतिक, भावेश फिगडे यांनी परिश्रम घेतले.





