…तर आता मला आता अटकही करतील : आमदार रोहित पवारांचा हल्लाबोल


…So now they will arrest me: MLA Rohit Pawar’s attack मुंबई : अजित दादांनी जेव्हा राष्ट्रवादी पक्ष चोरला त्यानंतर राज्यातही ईडीने देखील जोर धरला आहे. सर्व पुरावे देऊ देखील चुकीच्या पद्धतीने ईडीकडून कन्नड कारखाना जप्तीची नोटीस पाठवण्यात आली तर येत्या काही काळात मला अटक देखील होऊ शकते, असा असा हल्लाबोल आमदार रोहित पवार केला. ते म्हणाले की, आपण घाबरणार नाही, डगमगणार नाही, मी माझा संघर्ष सुरूच ठेवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी साखर कारखान्यावर जप्तीच्या नोटीस आल्यानंतर रविवारी पत्रकार परिषद घेतल्याप्रसंगी ते बोलत होते.

ईडीकडून कारखाना जप्तीची नोटीस
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. पवारांच्या बारामती अ‍ॅग्रो या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त करण्याची नोटीस काढली आहे. कारखान्याची 161 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे. जवळपास 50.20 कोटी रुपयांची मालमत्ता या कारवाईत जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे.




अजित पवारांनी पक्ष चोरताच ईडीन धरला जोर
आमदार रोहित पवार म्हणाले की, मला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पूर्ण बारामती अ‍ॅग्रो कुटुंबाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पहिल्यांदा केस फाईल केल्यानंतर दोन वर्ष ईडीचे अधिकारी शांत राहिले मात्र राज्याची सत्ता जेव्हा बदलली आणि जेव्हा पक्ष फुटला.. जेव्हा अजितदादांनी जुनाच साहेबांचा पक्ष चोरी करुन आमदारांना सोबत घेऊन बंड केलं.. त्यानंतर माझ्यावर जोरात कारवाया सुरू झाल्या आहेत.

अशी द्वेषपूर्ण कारवाई चुकीची : भाजपा प्रवेशानंतर मात्र कारवाया थांबतात
रोहित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माझ्यावर केसेस चालू आहेत. शरद पवार यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. ईडीने त्यांच्या विरोधात नोटीस काढली होती. अण्णा हजारे स्वतः म्हणतात या घोटाळ्यात शरद पवारांचं नाव नसतानाही त्यांचं नाव का घेतलं, हा प्रश्न आहे. पुढच्या दोन-तीन महिन्यात मला जेलमध्ये टाकलं जाईल, अशी शक्यता आहे. कुणी कष्टातून एखादी कंपनी मोठी करत असेल तर अशी द्वेषपूर्ण कारवाई करणं चुकीचं आहे. भाजपमध्ये गेलं की कारवाया थांबतात, परंतु मी लढणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता कन्नड येथे जावून शेतकरी आणि माझ्या सहकार्‍यांशी बोलणार आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !