भुसावळात कर्तृत्ववान रणरागिणीचा प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे सन्मान


Honored by Pratistha Mahila Mandal for an accomplished warrior in Bhusawal भुसावळ : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘नारी तू नारायणी ; सन्मान स्त्रीत्वाचा’ या कार्यक्रमाचे रविवार, 10 रोजी संतोषी माता सभागृहात आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे, उद्योगपती मनोज बियाणी, सोनू मांडे, माजी नगरसेवक किरण कोलते, रेलसिटीचे अध्यक्ष मनोज सोनार, सचिन नवगाळे, संगीता बियाणी, रश्मी शर्मा आदींची उपस्थिती होती.

नैराश्याकडे न वळण्याचा नाटीकेतून संदेश
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी अनुष्का आंबेकर हिने मधुर आवाजात स्वागतगीत म्हटले. महादेव ग्रुपने बहारदार नृत्य सादर करून रसिकांची दाद मिळवली. सक्षम नारी संस्थेने नैराश्याकडे वळू नका, जे निराश आहे त्यांना मानसिक आधार द्या, समजून घ्या, कोणत्याही अंधश्रद्धेला वा भोंदू बाबांना बळी पडू नका, मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या व आत्महत्या टाळा, टोकाची भूमिका घेऊ नका असा सल्ला नाटीकेतून दिला.




खचून न जाता कर्तव्य निभवा
प्रतिष्ठा महिला संस्थेच्या पदाधिकारी व कलाकारांनी ‘नारी तू नारायणी’ यावर अतिशय बहारदार नाटीका सादर केली. महिला ही स्वतः श्रेष्ठ आहे. जो देतो तो घेत नाही, तिच्यापासून सृष्टी तयार होते, अनेक नाते तयार होतात ती शक्ती आहे. महिलांनी खचून न जाता सक्षमपणे कर्तव्य व जबाबदारी सांभाळा, नारी सृजन आहे, असा संदेश देत नाटीका सादर केली. यावेळी महिलांनी विविध विषयांवर नाटिका, नृत्य आदी कलागुण सादर केले.

या मान्यवरांचा विशेष सन्मान
शहरातील विविध महिला संस्थाचे अध्यक्ष व सचिव यासह कर्तृत्ववान महिलांचा शाल, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. जिद्दीने प्रतिकूल परीस्थितीत सुद्धा मात करून जिभेने चित्र काढणारी व संगीत कलेची आवड जपणारी विकलांग चित्रकार राशी प्रवीण पाटील हिचा विशेष सत्कार करण्यात आला. यासह अ‍ॅथली- ममता जांगीड, शैक्षणिक क्षेत्रात संगीता बियाणी, कृषी क्षेत्रात संगीता पाटील, डॉ.रेखा पाटील, अध्यात्म माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यरत व डॉ.नीलिमा नेहते, महिलांना व्यायाम आणि आरोग्याबाबत कार्य तसेच भारत विकास परीषदेच्या माध्यमातून सामाजिक कार्य, नुपूर संस्थेच्या भरत नाट्य व कथ्थक नृत्य विशारद चारुलता भालेराव, नुपूर भालेराव, धनश्री मराठे, उद्योजिका सुनीता जोशी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले. यशस्वीतेसाठी वरुण इंगळे, अनिता आंबेकर, सोनल महाजन, मनीषा काकडे, वैशाली सैतवाल, जयश्री चौधरी, वैशाली भगत, पल्लवी वारके, रंजना परदेशी, वर्षा लोखंडे यांनी परिश्रम घेतले








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !