राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विकास कामासाठी वचनबद्ध : अॅड.रोहिणी खडसे
NCP Sharad Chandra Pawar party committed to development work: Adv. Rohini Khadse मुक्ताईनगर : उचंदा येथे माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सभागृह बांधकामासाठी 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याने राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे यांच्याहस्ते सभागृह बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.




शब्दाची केली वचनपूर्ती : अॅड.रोहिणी खडसे
अॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या की, जनसंवाद यात्रेवेळी मंदिरा समोर सभागृहासाठी निधी देण्यात येईल, असा ग्रामस्थांना शब्द दिला होता आज त्या शब्दाची वचनपूर्ती होत आहे. आमदार एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी विकासासाठी वचनबद्ध आहोत.
आमदार खडसेंच्या माध्यमातून उचंदा गावाच्या विकासासाठी भविष्यात आणखी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल, अशी त्यांनी ग्रामस्थांना ग्वाही दिली. जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, उचंदा ग्रामस्थांनी नेहमी कोणतीही अपेक्षा न करता शरद पवार साहेबांनी दिलेल्या उमेदवारांना कायम साथ दिली आहे ती साथ कायम ठेवा. ‘
]याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसेन्नजीत पाटील, माफदा राज्याध्यक्ष विनोद तराळ, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील, माजी सभापती सुधाकर पाटील, निवृत्ती पाटील, विकास पाटील, व्ही.पी.पाटील, सरपंच दीपक कोळी, बाजार समिती संचालक रामभाऊ पाटील, दत्ता पाटील, माणिक पाटील, संदीप देशमुख, अतुल पाटील, साहेबराव पाटील, डॉ.बी.सी.महाजन, शिवा पाटील, शांताराम धनगर, मुक्ताईनगर शहराध्यक्ष राजूभाऊ माळी, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल रोटे, तालुकाध्यक्ष मुन्ना बोडे, बाळा भालशंकर, जितेंद्र पाटील, रमेश भोलाने, आत्माराम पाटील, किरण तायडे, साहेबराव पाटील, प्रकाश पाटील, सद्दाम भाई शेख, प्रविण पाटील, प्रदीप पाटील, रतीराम पाटील, गजानन पाटील, सारंग पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.





