आगामी काळात येणारे सण-उत्सव शांततेत साजरे करा : पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल
Celebrate upcoming festivals in peace: Police Inspector Dr. Vishal Jaiswal रावेर : आगामी काळातील सण-उत्सव नागरीकांनी गुण्यागोविंदाने साजरे करावे, शहरातील शांतता टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य, असे आवाहन नूतन पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांनी केले.
धुलिवंदन, रंगपंचमी, रमजान महिना, तिथीनुसार शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलीस स्टेशन आवारात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक सचिन नवले, तुषार पाटील, घनश्याम तांबे उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, पीपल्स बँकेचे चेअरमन प्रल्हाद महाजन, अशोक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.








