निरोगी जीवनासाठी निसर्ग पूरक जीवनशैली अवलंबवावी : आरती चौधरी


Nature complementary lifestyle should be adopted for a healthy life : Aarti Chaudhary भुसावळ : महिलांनी आत्मविश्वास बाळगावा. आपल्या इच्छा कोणत्याही वयात पूर्ण करण्याची तयारी ठेवावी, इच्छाशक्ती जागरूक ठेवावी, स्वतःसाठी वेळ द्यावा व स्वच्छंदी राहावे म्हणजे आपले आरोग्य चांगले राहील. निसर्गाने आपल्याला जे दिलेले आहे ते हसत स्वीकारावे व निरोगी जीवनासाठी निसर्ग पूरक जीवनशैली अवलंबवावी. असे आवाहन समूपदेशक आरती चौधरी यांनी केले. श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या साप्ताहिक सभेत जागतिक महिला दिनानिमित्त सक्षम कॉन्सिलिंग सेंटरतफर्र्े आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
परमेश्वराने महिलांना मातृत्वाची देणगी दिली आहे. त्या कर्तृत्वात कुठेच कमी पडत नाही, असेही आरती चौधरी म्हणाल्या. महिला क्रीडा मंडळच्या चिवलता होसकोटे, जयश्री ओक, भारती चव्हाण, राजश्री कात्यायनी यांची उपस्थिती होती. गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सर्व उपस्थित महिलांचे रुमाल व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.




अध्यक्षस्थानी सुशीला पाटील होत्या. सचिव साधना हरिमकर यांनी सूत्रसंचालन तर पाहुण्यांचा परीचय निर्मला पाटील यांनी दिला. जयश्री विसपुते यांनी कोषाध्यक्ष म्हणून जवादारी सांभाळली तर शोभा जावळे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी प्रकाश विसपुते, महादेव हरिमकर, प्रकाश तायडे, एन.के.पाटील, रमाकांत पाटील, रामकृष्ण पाटील, प्रा.बी.डी.चौधरी, दिनकर जावळे, भानुदास येवले व इतर सभासदांनी सहकार्य केले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !