लोकसभेच्या उमेदवारीनंतर खासदार रक्षा खडसेंनी मानले पक्षश्रेष्ठींचे आभार


MP Raksha Khadse thanked the party leaders after his Lok Sabha candidature भुसावळ : रावेर लोकसभेसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसर्‍यांदा पक्षाने संधी दिल्यानंतर भाजपाच्या गोटातून सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अनेक गावांमध्ये आतषबाजी केली. दरम्यान, खासदार रक्षा खडसे यांनी पुनश्च उमेदवारी मिळाल्यानंतर सर्व पक्ष श्रेष्ठींचे आभार मानले आहेत.

माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये अधिक धाकधूक
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जे.पी.नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट दिल्याबद्दल मी मनापासून आभार मानते. सगळ्या जनतेचेही आपण आभार मानत असून तिसर्‍यांदा त्यांनी माझ्याबाबत सर्वेतही साथ दिली त्यामुळेच आपल्या नावाचा विचार झाला, असे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या. सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या मनातही आपल्याला तिकीट मिळावे, अशी इच्छा होती व ती पूर्ण झाली, असे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !