भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञानपद्धती’ विषयावर उद्या राष्ट्रीय परिषद


भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं..नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील मानव्य विद्याशाखेतर्फे शुक्रवार, 15 रोजी ‘भारतीय ज्ञान पद्धती ’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद होत असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील यांनी कळविले आहे.

यांची राहणार उपस्थिती
उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांच्याहस्ते होईल. ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी प्रमुख पाहुणे असतील. कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा.डॉ.आशुतोष पाटील हे ‘भारतीय ज्ञान पद्धती’ या विषयावर मार्गदर्शन करतील. परिषदेत जळगाव, नंदुरबार, धुळे तसेच राज्यातील इतर ठिकाणाहुन शोध निबंध पाठविण्यात आले आहे. प्रोफेसर, सहयोगी प्राध्यापक ,सहायक प्राध्यापक, संशोधक उपस्थित राहतील.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !