टहाकळी-मानपूर शिव रस्ता 30 वर्षानंतर झाला मोकळा

भुसावळ तहसीलदार लबडे यांच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांना लाभ


Tahakli-Manpur Shiv road opened after 30 years भुसावळ : टहाकळी-मानपूर हा शिवरस्ता गेल्या 30 वर्षापासून बंद होता यामुळे या भागातील शेतकर्‍यांची मोठी अडचण होत होती. याबाबत तहसीलदार निता लबडे यांनी या रस्त्याबाबत निर्णय देत 30 वर्षापासून बंद असलेला शिवरस्ता मोकळा झाला. यामुळे या भागातील शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

40 वर्षानंतर शेतकर्‍यांना दिलासा
मौजे टहाकळी-मानपूर ही शिव मोकळी करण्याबाबत सर्व शेतकरी यांना वरणगावचे मंडळ अधिकारी यांनी लेखी नोटीस देऊन रस्ता मोकळा करण्याबाबत कळविले होते. त्याच पार्श्वभूमीवर 11 मार्चला शिव रस्ता मोकळा करण्यासाठी तहसीलदार निता लबडे यांनी कार्यवाही केली. हा शिव रस्ता सुमारे 30 ते 40 वर्षांपासून बंद होता. सर्व शेतकरी यांना शेतात जाणण्या-येण्यासाठी खूप त्रास होत असल्याने सुमारे 60 शेतकरी यांना या शिव रस्त्याचा लाभ मिळाला आहे. शेतकरी यांनी स्वतःहून शिव मोकळी करण्यासाठी सहकार्य केले. काही शेतकर्‍यांना समजावून सांगितल्यावर यास विरोध दर्शवला नाही. त्यामुळे शेतकरी यांचे शेतातील मालाची ने-आण करणे सोयीस्कर होणार आहे. संबंधित शिव ही सुमारे पाच किमी मोकळी करण्यात आली. या प्रक्रियेस दोन दिवसांचा कालावधी लागला.




मौजे टहाकळी-मानपूर डांबरी रस्त्यालगत शिवच्या सुरुवातीला कुंभार यांनी वीट भट्टी लावल्याने, त्यांनी स्वतः सदर भट्टी निघाल्यावर शिव मोकळी केली. हा रस्ता शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत मोकळा करण्यासाठी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी रजनी तायडे, तलाठी निता जायले, कोतवाल तसेच वरणगांव पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !