भुसावळातील शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी युवराज लोणारी


Yuvraj Lonari as the President of Shiv Jayanti Utsav Samiti in Bhusawal भुसावळ : तिथीप्रमाणे 28 मार्च रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होत असून या उत्सवासाठी समितीची गठण करण्यात आले. समिती अध्यक्षपदी भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांची निवड करण्यात आली. शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच झाली. त्यात सर्वानुमते युवराज लोणारी यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष राजेश भोई, मिलिंद कापडे, राहुल तायडे, सचिव हर्षल पाटील, दलजीत चौधरी, पंकज हिंगणे, सहसचिव तुषार जाधव, दर्शन चिंचोले, विजय राठोड, खजिनदार उमाकांत शर्मा (नमा), जयेश कुटे, पवन पाटील आदींची निवड करण्यात आली.

उत्सवानिमित्त विविध स्पर्धा
युवराज लोणारी यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार करण्यात आला. त्यात मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्याचे ठरले. विजेत्यांचा सन्मानपत्र, ट्रॉफि व रोख पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. भुसावळ शहर शिवसन्मान पुरस्कार देण्याची घोषणाही करण्यात आली. बुधवार, 27 रोजी 12 रात्री वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक, माल्यार्पण आणि आकर्षक आतषबाजी तसेच गुरुवार, 28 रोजी सकाळी आठ वाजता नाहाटा कॉलेजपासून सर्व शिवभक्त -शिवप्रेमी मावळ्यांच्या उपस्थिती दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.




यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला मुकेश गुंजाळ, दीपक धांडे, रवी ढगे, निलेश महाजन, उमाकांत शर्मा (नमा), नितीन धांडे, रवी सपकाळे, किरण कोलते, माजी अध्यक्ष निलेश चौधरी, अमित खरारे, किरण मिस्त्री, योगेश बागुल, सुनील राखुंडे, कृष्णा शिंदे, सागर जाधव, आनंद वाटपडे, अल्बर्ट तायडे, रीतेश जैन, भूषण महाजन, अतुल गोसावी, दीपक सोनवणे, राजू भोई, बबलू राजपूत, भागवत तायडे, महेश लोणारी आदी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !