मुक्ताईनगर शहरात 15 फलक हटवले
15 boards removed in Muktainagar city मुक्ताईनगर : आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास मुक्ताईनगर नगरपंचायतीने सुरूवात केली असून शासकीय मालमत्तांवरील कोनशीला झाकण्यात येत असून झेंडे, बॅनर, फ्लेक्सबोर्ड जप्त केले जात आहे. पहिल्याच दिवशी राजकीय पक्षांचे 15 फलक (मोठे होर्ग्डिंज) जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी
शनिवारी दुपारी तीन वाजता आचारसंहिता जाहीर होताच मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या कर्मचार्यांनी शहरातील विविध भागातील राजकीय पक्षांचे बॅनर, फलक, झेंडे जप्तीची कारवाई सुरू केली तसेच शासकीय मालमत्तांवर असलेल्या राजकीय लोकप्रतिनिधींचे नाव झाकण्यात आले शिवाय विविध पक्षांनी आपापली नावे खाजगी भिंतीवर रंगवल्याने त्यावर कलर मारण्यात आला. शहरातील विविध भागातील राजकीय पक्षांनी उद्घाटन करून लावलेल्या राजकीय पाट्या झाकणची प्रक्रिया सुरूच होती.


