घड्याळ चिन्ह वापरताना अजित पवार गटाला पाळावे लागणार ‘सुप्रीम निर्देश’
Ajit Pawar group will have to follow the ‘supreme directive’ when using the clock symbol मुंबई : आगामी निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या गटाला घड्याळाचे चिन्ह वापरताना सुप्रीम कोर्टाने महतव्पूर्ण निर्देश घालून दिले आहेत. अजित पवार गटाने इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमांमध्ये नोटीस जारी करावी आणि प्रचाराच्या सर्व जाहिरातींमध्ये असे नमूद करावं की, त्यांना निवडणूक आयोगाने दिलेलं ‘घड्याळ’ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी हे पक्षनाव याबाबतचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे.
सार्वजनिक नोटीस जाहीर करण्याचे आदेश
शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासून घड्याळ हे पक्षचिन्ह त्यांच्यासोबत होतं. मात्र आता ते निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्याने मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे अजित पवार गटाने दुसर्या चिन्हाचा वापर करावा, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली. याबाबत झालेल्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाबाबतची नोटीस सार्वजनिक करण्याचे आदेश अजित पवारांच्या पक्षाला दिले आहेत.



शरद पवारांच्या गटाला मिळाला दिलासा
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला दिलासा देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे पक्षनाव आणि तुतारी फुंकणारा माणूस हे पक्षचिन्ह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान वापरण्यास परवानगी दिली आहे. तसंच हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने राखीव ठेवावं आणि अन्य कोणत्याही पक्ष किंवा उमेदवाराला देऊ नयेत, असे आदेश दिले आहेत.